धुळे: वेल्हाणे कुंडणे येथे विषारी औषध प्राशन करून तीस वर्षीय महिलेच्या मृत्यू, धुळे तालुका पोलीस ठाण्यात नोंद
Dhule, Dhule | Aug 23, 2024 धुळे तालुक्यातील वेल्हाणे कुंडाणे गाव परिसरात एका तीस वर्षीय महिलेने विषारी औषध प्राशन केल्याने धुळे सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचार दरम्यान मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. राधिका शाम नार्वे वय 30 मध्यप्रदेश हल्ली मुक्काम वेल्हाणे कुंडाणे असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे