हिंगणा: एमआयडीसीच्या जागांवर अतिक्रमित पट्ट्याचे वाटप करण्यासाठी संभाजीनगर च्या धरतीवर धोरणात्मक निर्णय हवा. आमदार: समीर मेघे
Hingna, Nagpur | Mar 17, 2026 एमआयडीसी हिंगणा क्षेत्रातील श्रमीकनगर सोनेगांव (निपाणी), अमरनगर व डिगडोह भागातील एमआयडीसीच्या जागांवर सुमारे ४५ वर्षापासून वास्तवास असलेल्या अतिक्रमीत पट्टयांचे वाटप करण्यासाठी संभाजीनगरच्या धर्तीवर धोरणात्मक निर्णय व्हावा. त्याकरिता एमआयडीसी बोर्डाच्या पुढील बैठकीत विषय घेण्यात यावा या आग्रही मागणीस विधीमंडळ सभागृहात राज्यमंत्र्यांनी मान्यता दिली. या सकारात्मक निर्णयामुळे सुमारे १३०० कुटुंबाचा निवासाचा प्रश्न निकाली लागणार आहे.