रामटेक: नगरधन येथे एका राहते घरी रामटेक पोलिसांनी पकडला प्रतिबंधित सुगंधित तंबाखू
Ramtek, Nagpur | Jun 3, 2026 पोलीस स्टेशन रामटेक अंतर्गत येणाऱ्या नगरधन येथे राजेश ढवरे याने त्याचे राहते घरी महाराष्ट्रात प्रतिबंधित सुगंधित तंबाखू विक्रीकरिता साठा करून ठेवल्याचे गुप्त माहितीवरून रामटेक पोलिसांनी धाड टाकून तो जप्त केल्याची माहिती बुधवार दिनांक 3 जूनला रामटेक पोलिसांनी दिली.या कारवाईत एकूण ७४.०१ किलोग्रॅम प्रतिबंधित तंबाखू किंमत 17,390 चा मुद्देमाल मिळून आला. आरोपी राजेश यास अटक करण्यात आली आहे.