धर्माबाद: प्रा. आ. केंद्र करखेली येथे CPHC प्रशिक्षण संपन्न; १३ आरोग्य सेवांचे थेट प्रात्यक्षिक
472 views | Nanded, Maharashtra | Oct 1, 2026 धर्माबाद (नांदेड): तालुक्यातील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना येथे प्राथमिक आरोग्य केंद्र करखेली अंतर्गत दोन दिवसीय सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवा (CPHC) प्रशिक्षण शिबीर उत्साहात पार पडले. या शिबिरादरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर नागरिकांना दिल्या जाणाऱ्या १३ अत्यावश्यक आरोग्य सेवांचे थेट प्रात्यक्षिक (Demonstration) दाखवून मार्गदर्शन करण्यात आले. ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा पोहोचाव्यात, यासाठी वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी आणि आशा स्वयंसेविकांना विविध तपासण्या व उपचारांचे सखोल प्रशिक्षण देण्यात आले. या शिबिराला आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.