रामटेक: रामटेक येथे महाविकास आघाडीचे उमेदवार अतुल लोंढे यांची बैठक संपन्न
Ramtek, Nagpur | Jun 8, 2026 नागपूर विधान परिषद, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार अतुल लोंढे यांना पाठिंबा देण्यासाठी माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांच्या रामटेक येथील जनसंपर्क कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत खासदार श्यामकुमार बर्वे, माजी मंत्री राजेंद्र मूळक, माजी आमदार आनंदराव देशमुख, नागपूर ग्रामीण अध्यक्ष अश्विन बैस प्रामुख्याने उपस्थित होते.