धुळे: माझी लाडकी बहीण योजना,लाभार्थींच्या खात्यातून कोणतीही रक्कम कपात न करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे निर्देश
Dhule, Dhule | Aug 27, 2024 राज्य शासनाने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेच्या पात्र महिला लाभार्थ्यांच्या खात्यात जुलै व ऑगस्ट 2024 या दोन महिन्यांचे प्रत्येकी 3 हजार रुपये डीबीटीद्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. या जमा झालेल्या रक्कमेतून बँकांनी कोणत्याही प्रकारची रक्कम कपात करु नये, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहे.