धुळे: जुनी पेन्शन आणि अन्य महत्त्वाच्या मागण्यांसाठी शासकीय कर्मचाऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने
Dhule, Dhule | Aug 27, 2024 जुनी पेन्शन आणि अन्य महत्त्वाच्या मागण्यांसाठी शासकीय राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या वतीने धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी करीत निदर्शने करण्यात आली. तसेच 29 ऑगस्ट पासून बेमुदत संपावर जाण्याच्या इशारा देत जिल्हा प्रशासनाला निवेदन देखील देण्यात आले आहे. यावेळी धुळे जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.