कळमेश्वर: मुख्यमंत्री बळीराजा शेत आनंद रस्ते योजना भव्य शुभारंभ सोहळा संपन्न
आज “मुख्यमंत्री बळीराजा शेत / पाणंद रस्ते योजना” चा भव्य शुभारंभ सोहळा संपन्न झाला. शेतकरी बांधवांच्या विकासासाठी सुरू करण्यात आलेल्या या महत्त्वपूर्ण योजनेचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित राहून या कार्यक्रमाचे उद्घाटन केले व उपस्थित सर्वांशी संवाद साधला. या रस्त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात जाण्यास सुलभता मिळणार असून, शेतीमालाची वाहतूक अधिक सोपी व जलद होणार आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली ही मागणी आज पूर्ण होत आहे, याचा मनस्वी आनंद होत आहे.