मंठा: घोटाळेबाज जिल्हा परिषदेत कारवाईचे ‘प्रहसन नाट्य’; चौकशी होऊनही कारवाईला टाळाटाळ
Mantha, Jalna | Apr 24, 2026 जालना जिल्हा परिषदेत झालेल्या कथित गैरव्यवहारांवर कारवाई करण्याऐवजी केवळ ‘प्रहसन नाट्य’ सुरू असल्याचा आरोप पुढे येत आहे. मंठा तालुक्यातील मच्छिंद्र चिंचोली येथील बोगस कामांच्या प्रकरणात चौकशी होऊनही प्रत्यक्ष कारवाई न झाल्याने प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा परिषद अंतर्गत विविध विकासकामांसाठी निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात कामे न करता कागदोपत्री कामे दाखवून लाखो रुपयांचा अपव्यय झाल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी झालेल्या चौ