कळमेश्वर: कळमेश्वर मध्ये कचऱ्याला लावलेली आग भडकली, मुख्याधिकारी व अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला
कळमेश्वर येथील बायपास रोड वरील पीडब्ल्यूएस कॉलेज समोर कचरा पेटवण्यासाठी लावलेली आग अचानक वेगाने पसरली आणि तिने रुद्ररूप धारण केले कचऱ्याच्या ढिकार्याने पेट घेतल्यामुळे परिसरात काही काय भीतीचे वातावरण निर्माण झाले होते या घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी तात्काळ कळमेश्वर नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना दिली माहिती मिळताच मुख्याधिकाऱ्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून त्वरित पावले उचलली त्यांच्या निर्देशानुसार अग्निशमन दलाची गाडी तात्काळ घटनास्थळी दाखल झाली