रामटेक: मनसर माईन्स येथे खर्रा न दिल्याने संतप्त युवकाने 37 वर्षीय मजुरावर ब्लेडने केला हल्ला
Ramtek, Nagpur | Jun 18, 2026 पोलीस स्टेशन रामटेक अंतर्गत येणाऱ्या मनसर माईन्स परिसरात एका युवकाने खर्रा मागितल्यावर तो न मिळाल्याने संतप्त होऊन एका 37 वर्षीय मजुरावर ब्लेडने हल्ला करून त्याला जखमी केले. ही घटना 17 जून च्या रात्री नऊ वाजता च्या दरम्यान घडली. जखमीचे नाव मंगेश मुन्ना इनवाते असे असून आरोपींची नावे कौशिक उर्फ छोटू रवी मडावी व त्याचा मामा राकेश गुलाब वरठी असे आहे. रामटेक पोलिसांनी चौकशी अंती दोघांनाही अटक केली आहे