मंठा: मठा कृषी निविष्ठा विक्रेत्यांचे सोमवारपासून आंदोलन
Mantha, Jalna | Apr 25, 2026 शासनाच्या जाचक नियमांविरोधात मंठा तालुक्यातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी सोमवार (ता. २७) पासून राज्यव्यापी बंद आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील विक्रेत्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, अवैध कीटकनाशके व खते यांची थेट शेतकऱ्यांना अनधिकृत एजंटमार्फत विक्री होत असून, यावर नियंत्रण आणण्याऐवजी अधिकृत विक्रेत्यांवरच कठोर नियम लादले जात आहेत. तसेच बियाणे विक्री सक्तीची करण्याच्या निर्णय