कळमेश्वर: गोंडखैरी येथे श्री साईबाबा पुण्यतिथी महोत्सवानिमित्त शोभायात्रेचे आयोजन
कळमेश्वर तालुक्यातील गोंडखैरी (वार्ड क्र. ५) येथे श्री साई सेवा पंचकमेटी संस्थानतर्फे श्री साईबाबा पुण्यतिथी महोत्सवानिमित्त गावातील मुख्य मार्गाने टाळ-मृदुंगाच्या गजरात भव्य शोभायात्रा उत्साहात पार पडली. गावाच्या कानाकोपऱ्यात ‘सबका मालीक एक’ या संदेशाने भक्तिभावाचे वातावरण निर्माण झाले.गुरुवारी हभप राजूजी महाराज मंगरुळीकर यांच्या हस्ते अभिषेक व कलश स्थापना झाली.