कळमेश्वर: घरकर वाढी विरोधातील धडक मोर्चा शांततेत यशस्वी, 31 जुलै पर्यंत निर्णय न झाल्यास कळमेश्वर बंदचा इशारा
कळमेश्वर शहरातील वाढीव घरकराच्या विरोधात नागरिकांनी काढलेला धडक मोर्चा शांततेत व उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडला. बाजार चौक ते नगरपरिषद कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या या मोर्चात नागरिक, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.मोर्चादरम्यान नगराध्यक्ष व मुख्य अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.