समुद्रपूर: शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी करणाऱ्या अट्टल चोरट्यांना समुद्रपूर पोलिसांनी नागपुरातून घेतले ताब्यात
समुद्रपुर:घरात कुणी नसल्याची संधी साधून घरफोड्या करणारे चोरटे अखेर समुद्रपूर पोलिसांच्या ताब्यात आले असल्याने विविध गुन्हाचा खुलासा होण्याची शक्यता समुद्रपूर पोलिसांनी वर्तविली आहे.समुद्रपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत छोट्या मोठ्या चोरीच्या घटना मागील 3 महिन्यात घडल्या. मात्र चोरटे पोलिसांना चकमा देण्यात यशस्वी ठरले होते.अखेर समुद्रपूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार संतोष शेगावकर यांनी तपासाचे सूत्र हाती घेत चोरट्याचे मुसके आवरले.