मंडणगड: धोकादायक अवस्थेत देव्हारे पुल, तातडीने पाहणी आणि नव्या पुलासाठी मागणी
देव्हारे पंचक्रोशी हायस्कूलजवळील ओढ्यावर असलेला जुना पूल धोकादायक अवस्थेत आहे. अवजड वाहने आणि पावसाळ्यातील पाण्याच्या प्रवाहामुळे त्यावर ताण वाढत आहे. भाजपा अनुसूचित जाती मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीस अभिजीत देवळेकर यांनी तांत्रिक पाहणी करून नवीन पूल बांधण्याची मागणी केली आहे.