रोहा: तहसील कार्यालयात पाण्यासाठी माकडांची धाव
Roha, Raigad | May 27, 2026 जंगल नष्ट होत आहे तर दुसरीकडे सूर्यनारायणाचा प्रकोप वाढत असल्याने रोह्यात पशुपक्षी, प्राणी पाण्यासाठी शहरी वस्तीकडे येताना दिसत आहेत. अशीच घटना मंगळवारी सकाळी रोहा तहसीलदार कार्यालय घडली. पाण्यासाठी चक्क माकडे तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार यांच्या दालनातील पाणी बॉटल घेताना दिसत होते. ही माकडांची धडपड बघून नायब तहसीलदार वैशाली काकडे भाबड यांनी या माकडांना ग्लास व पाण्याच्या बाटलीतून पाणी पाजले.