रामटेक: मानेगाव टेक येथे रस्ता दुभाजकावर चढली एक कार
Ramtek, Nagpur | Jun 4, 2026 देवलापार पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नागपूर - जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील मानेगाव टेक परिसरात जबलपूरकडून नागपूरकडे येणारी एक कार अनियंत्रित होऊन महामार्गाच्या दुभाजकावर चढल्याची घटना बुधवार दिनांक चार जूनला सायंकाळी घडल्याची माहिती समोर आली आहे. ही अनियंत्रित कार रस्ता दुभाजकाच्या मधोमध येऊन रस्ता दुभाजकावरून घासत पुढे गेली. यात कुठलीही मोठी हानी झाली नसल्याचे प्रत्यक्ष दर्शनी सांगितले.