जालना: आरटीओच्या वाहनाची दुचाकीला धडक; ट्रक वर कारवाई करण्यासाठी आरटीओच्या वाहनाला ओव्हरटेक करणे पडले महागात
Jalna, Jalna | Aug 21, 2026 जालना तालुक्यातील अंबड रोडवरील इंदेवाडी आणि कुंबेफळ फाट्याच्या दरम्यान आरटीओच्या वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने भीषण अपघात झाल्याची घटना डली. ट्रकवर कारवाई करण्यासाठी ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करणार्या आरटीओच्या वाहनाने दुचाकीस्वाराला धडक दिली. शुक्रवार दि. 21 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याचे प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले. शिवलिंग लंगोटे, रा. माऊली नगर, जालना असे जखमी इसमाचे नाव असल्याची माहिती मिळाली.