नरखेड: नरखेड पोलीस स्टेशन: गुन्हेगारीत घट, अवैध धंद्यांवर कारवाईचा धडाका
नरखेड तालुक्यात गुन्हेगारी वाढल्याच्या चर्चांना पूर्णविराम देत, नरखेड पोलिसांनी गेल्या वर्षीच्या तुलनेत (जानेवारी ते एप्रिल २०२६) गुन्हेगारीत मोठी घट झाल्याची आकडेवारी जाहीर केली आहे. अवैध धंद्यांविरुद्धच्या मोहिमेत पोलिसांनी मोठी कामगिरी बजावली आहे.गुन्हेगारीवर वचक बसवण्यासाठी पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत:भारतीय नागरीक सुरक्षा संहितेच्या कलमांखाली **१६४** गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली.