आज दिनांक 18 फेब्रुवारी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीदरम्यान एका महिला उमेदवाराची तब्येत अचानक बिघडली. त्यानंतर संबंधित तरुणीला तातडीने जालना येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्या तरुणीचे नाव गौरी जाधव असे असल्याची माहिती मिळाली आहे. ती पोलीस भरतीसाठी जालना येथे आली होती. आज मैदानी चाचणी सुरू असताना तिला अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे तिला तात्काळ रुग्णवाहिकेद्वारे जालना येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून