अमरावती: परभणी येथील संविधान शिल्पाच्या प्रतिकृतीची विटंबना प्रकरणी दोषींना तत्काळ अटक करा: वंचित चे जिल्हाधिकारी यांना निवेदन
परभणी येथील संविधान शिल्पाच्या प्रतिकृतीची विटंबना प्रकरणी दोषींना तत्काळ अटक करण्यात यावी तसेच निर्दोष लोकांवर पोलीस प्रशासनाकडून होत असलेली कार्यवाही थांबविण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अमरावती जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनातून शुक्रवारी 13 डिसेंबर रोजी दुपारी चार वाजता करण्यात आली. निवेदन देताना राहुल मेश्राम, सिद्धार्थ भोजने, प्राजक्ता पिल्लेवान आदी कार्यकर्ते उपस्थित होते.