रामटेक: नगरपरिषद रामटेक द्वारे अतिक्रमण निर्मूलन मोहिमेला व्यापाऱ्यांचा प्रतिसाद तर कुठे संताप
Ramtek, Nagpur | May 15, 2026 नगरपरिषद रामटेक द्वारे रामटेक शहरातील मुख्य चौक तसेच मार्गावरील अतिक्रमण निर्मूलन कारवाई मागील तीन दिवसांपासून सुरू आहे. याच महिन्यांतर्गत शुक्रवार दिनांक 15 मे ला रामटेक शहरातील गांधी चौक येथील राखी तलाव मार्गावरील नगरपरिषद कॉम्प्लेक्स च्या दुकानदारांनी स्वतः आपल्या दुकानासमोरील नगर परिषदे ला अपेक्षित अतिक्रमण दूर केले. तर काही दुकानदारांनी या कारवाईबाबत संताप व्यक्त केला आहे.न. प. मात्र कडक कारवाई वर ठाम आहे.