सावंतवाडी: आंबोली घाटात झाड पडून वाहतूक तासभर थांबली
आंबोली घाटात नाना पाणी पॉइंटजवळ झाड पडल्यामुळे वाहतूक एक तास बंद होती. वन विभाग आणि जलद प्रतिसाद पथकाने तत्काळ झाड हटवून सकाळी ९:४५ वाजता वाहतूक पूर्ववत केली. राष्ट्रीय महामार्ग अधिकारी यांनी वाहतूक सुरळीत असल्याची माहिती दिली.