फौजदार चावडी पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार सुरज ऊर्फ नागेश शिवाजी महानुर (वय ३४ वर्षे) याला एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्ध करून सोमवारी त्याची रवानगी पुण्यातील येरवडा कारागृहाकडे करण्यात आली.पोलीस आयुक्त एम राज कुमार यांनी त्याच्या स्थानबद्धतेचे आदेश जारी केले.त्याच्याविरुध्द ६ गंभीर गून्हे दाखल आहे.अशी माहिती आज दूपारी माहिती कक्षातून देण्यात आली.