नाशिक: अंबड भागातील सिंहस्थ नगर सिडको येथे गळपस घेऊन तरुणाने केली आत्महत्या
Nashik, Nashik | Jan 11, 2026 अंबड भागातील सिंहस्थ नगर सिडको येथे गळपस घेऊन तरुणाने आत्महत्या केल्याची घटना दिनांक 10 जानेवारी रोजी घडली असून संध्याकाळी साडेपाच वाजता अंबड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 11 जानेवारी रोजी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अनिल राजू इंगळे वय 21 राहणार शिस्त नगर सिडको यांनी राहत्या घरातील छताच्या अँगलला साडीने गळफास घेतला. त्याचा भाऊ रवि राजू इंगळे यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात औषध उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी त्यापासून मृत घोषित केले.