नरखेड: सार्वजनिक ठिकाणी गांजाचे सेवन करणाऱ्या तिघांना नरखेड पोलिसांनी घेतले ताब्यात
Narkhed, Nagpur | May 18, 2026 नरखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत नरखेड आठवडी बाजार आणि चोरखैरी फाटा परिसर येथून निलेश रामेश्वर खुरसंगे (वय २३, रा. पांढुर्णा), धनराज अंबादास जैस्वाल (वय ५८, रा. खैरगाव) आणि तुळशिराम दयाराम चचाणे (वय ७०, रा. अंबाडा देशमुख) या तिघांना सार्वजनिक ठिकाणी गांजा सेवन करताना पकडण्यात आले. त्यांच्याकडूनही साहित्य जप्त करून एन.डी.पी.एस. कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.