रोहा: कोकण रेल्वेमार्गाचे दुपदरीकरण होणार
Roha, Raigad | Jun 17, 2026 सद्यस्थितीत कोकण रेल्वे मार्गावरील प्रवासी सेवा अधिक गतिमान आणि सुरक्षित करण्याकरिता कोकण रेल्वे प्रशासनाने विविध उपाययोजना हाती घेतल्या असून, त्याच बरोबर कोकण रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाकरिता कोकण रेल्वे महामंडळाने केंद्र सरकारकडे निधीचा प्रस्ताव सादर केला आहे. विद्यमान प्रवासी सेवा प्रभावी करण्याकरिता सिग्नल यंत्रणा सक्षम करण्यासाठी ९९.६८ कोटी खर्चुन 'कवच' सुरक्षा प्रणाली बसवली जाईल. ११ रेल्वे फाटकांच्या जागी उड्डाणपूल उभारून मानवरहित फाटकांचा प्रश्न २७१.२२ कोटी खर्चुन सोडविला जाईल.