जिवती: जिवतीत कापसाला प्रतिक्विंटल 15 हजार रुपये भाव देण्याची मागणी
जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी आर्थिक संकट निर्माण झाले आहे. कमी पावसामुळे कापसाचे उत्पादन घटले आहे. शिवसेना संपर्क प्रमुख अरविंद चव्हाण यांनी कापसाला प्रतिक्विंटल 15 हजार रुपये भाव देण्याची मागणी मुख्यमंत्री व कृषिमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.