रामटेक: रामटेक शहरातील तीळभांडेश्वर मंदिरावर पडली विज
Ramtek, Nagpur | Apr 2, 2026 बुधवार दिनांक 1 एप्रिलला रात्री दहा वाजता पासून विजेच्या कडकडाटा सह शहरात सुरू झालेल्या अवकाळी पावसा दरम्यान रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास रामटेक शहरातील आझाद वार्डातील पुरातन शिवाचे तीळभांडेश्वर मंदिरावर वीज पडल्याने मंदिराच्या वरील भागाला तडे गेले आहेत. मंदिराच्या या भागाचे काही तुकडे खाली पडले तर मंदिराच्या आतील भागातील विद्युत बोर्ड तर काही ठिकाणी विद्युत वायरिंग उखडल्या गेली.