रामटेक: सामाजिक वनीकरण वन विभाग रामटेकचा कम्प्युटर ऑपरेटर युवक आठ दिवसांपासून बेपत्ता
Ramtek, Nagpur | May 1, 2026 सामाजिक वनीकरण वन विभाग रामटेक येथे कम्प्युटर डेटा ऑपरेटर म्हणून काम करणारा 35 वर्षीय सारंग बाबुलाल धरणे रा. भिलवाडा हा मागील आठ दिवसांपासून बेपत्ता आहे. नातेवाईक,मित्रमंडळी सह अन्यत्र त्याचा शोध घेतला असता त्याचा कुठेही पत्ता लागू शकलेला नसल्याने विविध तर्क वितर्क चर्चेत आहेत. बेपत्ता सारंग याचे मागील मार्चमध्ये साक्षगंध झाले होते.तसेच येणाऱ्या 25 मे ला त्याचे लग्न ठरले होते अशातच तो बेपत्ता झाल्याने त्याचे कुटुंबीय चिंतेत आहेत.