नंदुरबार: वावद गावाजवळ दुचाकीचा अपघात गंभीर जख्मी व्यक्तीला पाऊण तास होऊनही रुग्णवाहिका उपलब्ध नाही
नंदुरबार दोंडाईचा रस्त्यावर वावद गावाजवळ आज दुपारी बाराच्या सुमारास भीषण अपघात झाला. अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकी चालक गंभीर जखमी झाला. घटनास्थळी उपस्थित वाहनधारकांनी आपली वाहन थांबून 108 रुग्णवाहिकेला संपर्क साधला परंतु पाऊण तास झाला तरीही रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली नसल्याने अखेर एका खाजगी कार चालकाने गंभीरित्या जखमी झालेल्या व्यक्तीला आपल्या कार मध्ये बसून नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे