नंदुरबार: जनसुरक्षा कायदा विरोधात १५ मे रोजी विविध संघटनांचा नंदुरबार शहरात भव्य निषेध मोर्चा
महाराष्ट्र सरकारने जनसुरक्षा विधेयक कायदा आणला असून तो कायदा आता राज्यपाल जवळ मंजुरी साठी गेला आहे. हा कायदा आदिवासी बहुजन व इतर समाजाच्या लोकांसाठी नुकसान कारक आहे. त्यामुळे जन सुरक्षा विधेयक कायदा रद्द करावा यासाठी १५ मे रोजी नंदुरबार जिल्हातील विविध संघटने कडून भव्य निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात जिल्ह्यातून जवळपास ५० हजाराच्या वर नागरिक सहभागी होणार आहे. या संदर्भात शासकीय विश्रामगृह येथे आज सायंकाळी बैठक पार पडली.