नंदुरबार: माळीवाडा परिसरातील सीआयएसएफ जवान लग्न घर सोडून भुज सीमा वरती भागात रवाना #opration sindoor
भारत-पाकिस्तान सीमावरती भागात तणाव निर्माण झाल्याने नंदुरबार शहरातील माळीवाडा परिसरातील सीआयएसएफ जवान किशोर भगवान माळी यांना आपले लग्न घर सोडून कर्तव्यावर असलेले भुज या सीमा वरती भागात परतावे लागले आहे. काल रात्री बाराच्या सुमारास नंदुरबार शहरवासीयांनी त्यांचे ऑप्शन करून स्वागत केले. याप्रसंगी नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमित कुमार मनेळ भाजपा जिल्हाध्यक्ष निलेश माळी यांच्यासह माळीवाडा परिसरातील नागरिक उपस्थित होते.