मोपेडच्या नंबर प्लेट मध्ये छेडछाड केल्याच्या संशयावरून नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या गुन्हेशोध पथकाने एका अट्टल दुचाकी चोराच्या मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून सव्वा चार लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या मोटोरसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत . आज दिनांक सहा जानेवारी रोजी दुपारी एक वाजता उपयुक्त किशोर काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हेशोध पथकाला शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांचीही मदत झाली .वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार गुन्हे शोध पथक चोरीस गेलेली वाहने आणि संशयितांचा शोध घेत होते.