औंढा नागनाथ: आषाढी एकादशी निमित्त श्री नागनाथ मंदिरातील विठ्ठल रुक्मिणीची आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते सपत्नीक महापूजा संपन्न
आषाढी एकादशी निमित्त औंढा नागनाथ येथील आठवे ज्योतिर्लिंग श्री नागनाथ मंदिराच्या संत नामदेव सभागृहात असलेल्या विठ्ठल रुक्मिणीची दिनांक 06 जुलै रविवार रोजी सकाळी सात वाजता कळमनुरी विधानसभा मतदार संघाचे आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते सपत्नीक महापूजा पार पडली आहे. विठ्ठल रुक्मिणी दुग्ध अभिषेक करून आमदार बांगर यांच्या हस्ते सपत्नीक आरती करण्यात आली. यावेळी मंदिराचे अध्यक्ष तहसीलदार हरीश गाडे, यांच्यासह इतरांची उपस्थिती होती. मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी सकाळपासूनच प्रचंड गर्दी केली आहे