*राज्याच्या सार्वजनिक आरोग्य सेवेला मिळणार बळकटी;१४४० वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियुक्ती आदेश*
2.4k views | Gondia, Maharashtra | Nov 4, 2026 *राज्याच्या सार्वजनिक आरोग्य सेवेला मिळणार बळकटी;१४४० वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियुक्ती आदेश* - *६७४ विशेषज्ञांसह ७६६ एमबीबीएस डॉक्टरांचा समावेश* गोंदिया : राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना, विशेषतः ग्रामीण, दुर्गम आणि आदिवासी भागातील जनतेला दर्जेदार व वेळेवर आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सार्वजनिक आरोग्य विभागाने वैद्यकीय अधिकारी भरतीला प्राधान्य दिले आहे. महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट-अ (एस-२०) संवर्गातील १ हजार ४४० वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियुक्ती आदेश वितरित करण्याचा विशेष समारंभ उद्या ४ नोव्हेंबरला आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये ६७४ विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी आणि ७६६ एमबीबीएस वैद्यकीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या नियुक्त्यांमुळे राज्याच्या सार्वजनिक आरोग्य यंत्रणेला मोठे मनुष्यबळ मिळणार असून शासकीय रुग्णालयांमधील वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता दूर करण्यास मदत होणार आहे.