नरखेड: सट्टापट्टी चालवणाऱ्यावर पोलिसांची कारवाई
८ जुलै रोजी मौजा मोवाड परिसरात धाड टाकून अवैध सट्टापट्टी चालवणाऱ्या रमेश राजाराम बोरकर (वय ५९, रा. मोवाड) याला रंगेहात पकडले. आरोपीकडून सट्टापट्टीचे साहित्य आणि १,१९० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी नरखेड पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायद्याच्या कलम १२ अ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.