आईच्या खुनानंतर परराज्यात पळण्याचा प्रयत्न फसला; आरोपीला अवघ्या ३ तासांत अटक...
अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विझोरा गावात आईच्या खुनाच्या प्रकरणात फरार झालेल्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या तीन तासांत अटक केली. आरोपी सागर शांताराम पांडे याने कौटुंबिक वादाच्या रागातून आपल्या आईची हत्या केल्याचा आरोप आहे.
घटनेनंतर आरोपी जंगलात पळून गेला होता आणि परराज्यात फरार होण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ शोधमोहीम सुरू केली. तपासादरम्यान आरोपी टॉवर चौक परिसरात दिसल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.
आरोपीला पुढील कारवाईसाठी बार्शीटाकळी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या जलद आणि प्रभावी कारवाईमुळे स्थानिक गुन्हे शाखेचे कौतुक होत आहे.
व्हिडिओ 🎥 : महाव्हाईस न्यूज डेस्क
#CrimeNews #Akola #Barshitakli #PoliceAction #MaharashtraNews #CrimeUpdate #LocalCrime #IndiaNews #LatestNews