अमरावती: बारूद घेऊन जाणारा ट्रक बडनेरा हद्दीत राम मेघे कॉलेज मार्गावर पलटी, सुदैवाने जीवित हानी टळली
बडनेरा पोलीस स्टेशन हद्दीत 7 डिसेंबरच्या रात्री राम मेघे कॉलेज मार्गावर बारूद घेऊन जाणारा कंटेनर ट्रक पलटी झाला. सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवित हानी झाली नाही. अपघातानंतर रस्त्यावर बारूद पडले होते.माहितीनुसार जीजे 03 बी डब्ल्यू 24 67 क्रमांकाचा ट्रक नागपूर वरून बाजारगाव येथील ऑर्डीनन्स फॅक्टरीतून बारूद चा कच्चामाल घेऊन गुजरात येथे जात होता. हा ट्रक एक्सप्रेस हायवेने जात असताना अचानक समोर आलेल्या एका ट्रॅक्टरला वाचविण्याच्या प्रयत्नात ट्रक पलटी झाला.