पुण्यात दररोज १,१०० टन ओला कचरा; प्रक्रिया मात्र ३९५ टनांवरच!
पुणे शहरातील वाढत्या ओल्या कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. शहरात दररोज सुमारे १,१०० मेट्रिक टन ओला कचरा निर्माण होतो. मात्र, महापालिकेच्या १४ प्रक्रिया प्रकल्पांमधून प्रत्यक्षात केवळ ३९५ टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते.
सुस प्रकल्पाची क्षमता २०० टन असतानाही प्रक्रिया फक्त ४० टनांवर होत आहे, तर कात्रज रॅम्प प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यरत आहे.
कचरा प्रक्रिया क्षमता वाढवण्यासाठी PMCकडून ५०० टनांचा नवा प्रकल्प, CBG प्रकल्प आणि BPCLच्या ३०० टनांच्या गॅस प्रकल्पावर भर दिला जात आहे.
२०१७ आणि २०२१च्या हद्दवाढीनंतर पुण्यात ३२ गावे आणि सुमारे ७–८ लाख लोकसंख्या वाढली; मात्र त्याच प्रमाणात कचरा प्रक्रिया क्षमता वाढली नाही.
पुण्याचा कचरा प्रश्न सुटणार कधी? तुमचे मत कमेंटमध्ये सांगा. 👇
#Pune #PuneNews #PuneUpdates #PuneCity #PuneMunicipalCorporation #PMC #PuneMunicipalCorporation #PuneWaste #WetWaste #WasteManagement #PuneGarbage #GarbageCrisis #WasteProcessing #PuneCivicNews #PuneLatestNews #MaharashtraNews #Maharashtra #UruliDevachi #Katraj #Sus #CBG #BPCL #CivicIssues #TimesOfMaharashtra
Pune City, Pune | Aug 26, 2026