पुणे महापालिकेकडे स्वच्छ हवा योजनांसाठी ₹105.25 कोटींचा अखर्चित निधी!
राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम (NCAP) आणि 15व्या वित्त आयोगाअंतर्गत मिळालेल्या निधीपैकी ₹105.25 कोटी अद्याप खर्च झालेले नाहीत. राज्य सरकारने या निधीचे उपयोगिता प्रमाणपत्र 5 सप्टेंबरपर्यंत सादर करण्याचे निर्देश PMC ला दिले आहेत.
पुणे एअर ॲक्शन हबने निधी घाईघाईने खर्च न करता डेटा-आधारित आणि परिणामकारक उपाययोजनांवर भर देण्याची मागणी केली आहे.
वाहतूक, बांधकामातील धुळीचे प्रदूषण, उघड्यावर कचरा जाळणे आणि इतर प्रमुख प्रदूषण स्रोतांवर निधी खर्च करण्याची शिफारस करण्यात आली आहे.
तसेच, वायू प्रदूषण नियंत्रणासाठी स्वतंत्र Air Quality Cell स्थापन करावे आणि निधीच्या वाटपापूर्वी नागरिक व तज्ज्ञांशी चर्चा करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
👉 पुण्याच्या हवेच्या गुणवत्तेबाबत तुमचे मत काय? कमेंटमध्ये सांगा.
📲 अशाच स्थानिक आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी Times of Maharashtra ला Follow करा.
#Pune #PuneNews #PuneMunicipalCorporation #PMC #PuneAirPollution #PuneAirQuality #AirPollution #CleanAir #NCAP #NationalCleanAirProgramme #PuneAirActionHub #MaharashtraNews #PuneBreakingNews #PuneUpdates #PuneCity #PuneEnvironment #AirQuality #Pollution #CivicNews #TimesOfMaharashtra
Pune City, Pune | Aug 26, 2026