केजमध्ये सामाजिक सलोख्याचे दर्शन; ईद मिलादच्या जुलूसमधील तरुणांकडून शिवतीर्थावर फुलांचा वर्षाव.
केज : ईद मिलादुन्नबी निमित्त काढण्यात आलेल्या जुलूसदरम्यान केज शहरात सामाजिक सलोख्याचे अनोखे दर्शन घडले. जुलूसमधील मुस्लिम समाजातील तरुणांनी शिवतीर्थावर फुलांचा वर्षाव करून हिंदू-मुस्लिम ऐक्याचा आणि परस्पर बंधुभावाचा संदेश दिला.
या प्रसंगी उपस्थित नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले. विविध समाजातील नागरिकांनी एकमेकांच्या धार्मिक भावना आणि परंपरांचा आदर राखत शांतता व सामाजिक एकोपा कायम ठेवण्याचे आवाहन केले.
ईद मिलादच्या जुलूसदरम्यान घडलेल्या या प्रसंगामुळे शहरातील सामाजिक ऐक्याची भावना अधिक दृढ झाली. धार्मिक सौहार्द आणि बंधुभावाचा संदेश देणारा हा उपक्रम नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरला.
#kejnews #socialharmony #hindumuslimunity #beednews #julus
Pune City, Pune | Aug 26, 2026