मौदा: अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणारे वाहन माथनी शिवारात मौदा पोलिसांनी पकडले
Mauda, Nagpur | Mar 29, 2026 गुप्त माहितीच्या आधारे मौदा पोलिसांच्या पथकाने माथनी शिवारात अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणारे वाहन पकडल्याची घटना घडली. त्यावरून वाहन जप्त करण्यात येऊन जनावरे गोरक्षण मध्ये सोडण्यात आले. आरोपीविरुद्ध मौदा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला.