नरखेड: पोलीस भवन येथे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांच्यासाठी सर्व कर्मचारी संवाद बैठक संपन्न
पोलीस महासंचालक यांच्या निर्देशानुसार आज पोलीस भवन येथे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी नागपूर ग्रामीण जिल्हा येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांची सर्व कर्मचारी संवाद बैठक घेतली. यावेळी त्यांनी उपस्थित पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या अडीअडचणी कामाकर्जा संदर्भातील विविध मुद्दे तसेच नवनवीन कल्पना या विषयांवर चर्चा करण्यात आली.