बीड तालुक्यातील आडगाव येथे रविवारी दुपारी अचानक लागलेल्या भीषण आगीत सुमारे १५ एकर ऊसपिक जळून खाक झाले आहे. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे प्राथमिक निष्कर्ष समोर आले आहेत. या आगीत शेतकरी अंकुश हरिभाऊ जामकर यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून त्यांच्या मेहनतीने जोपासलेले संपूर्ण ऊसपिक काही क्षणात राख झाले. घटनेनंतर ग्रामस्थ आणि शेजारच्या शेतकऱ्यांनी धाव घेऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला, मात्र वाऱ्याच्या वेगामुळे आग झपाट्याने पसरली.