पालघर: धाकटी डहाणू व डहाणू तालुक्यातील किनारपट्टी परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे ५० मच्छीमार बोटींचे नुकसान
पालघर जिल्ह्यात वादळीवारासह अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली आहे जिल्ह्याच्या पश्चिम किनारपट्टी परिसरात वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. धाकटी डहाणू व डहाणू तालुक्याच्या किनारपट्टी परिसरात वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे समुद्रकिनाऱ्यावर व जेट्टी परिसरात बांधून ठेवण्यात आलेल्या बोटी एकमेकांवर आदळून बोटी व बोटीतील साहित्याचे नुकसान झाले आहे. धाकटी डहाणू व डहाणू तालुक्यातील किनारपट्टी परिसरात 50 मच्छिमार बोटींचे नुकसान झाले आहे.