रामटेक: चौघान येथे चप्पलच्या वादातून 18 वर्षीय युवकाचा निर्घृण खून ; 4 आरोपी अटकेत
Ramtek, Nagpur | Apr 6, 2026 पोलीस स्टेशन रामटेक अंतर्गत येणाऱ्या सोनेघाट ग्रामपंचायत क्षेत्रातील चौघांन परिसरातील सोना ब्रिक्स या वीट भट्ट्यावर किरकोळ वादातून एका 18 वर्षीय युवकाचा निर्घृण खून झाल्याची घटना रविवार दिनांक 5 एप्रिलला रात्री 8 वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी रामटेक पोलिसांनी तात्काळ कारवाई करीत अवघ्या दोन तासात चार आरोपींना गजाआड केले आहे. मृतकाचे नाव समीर राजू ध्रुव वय 18 वर्षे रा. ढाबाडी जिल्हा बडोदा बाजार,छत्तीसगड असे असून तो या वीट भट्ट्यावर मजुराचे काम करायचा.