खेड तालुक्यातील दहिवली येथे दरड कोसळून दुर्दैवी दुर्घटना; २१ तासांचे अथक बचावकार्य.
दि. ०६ जुलै २०२६ रोजी खेड तालुक्यातील दहिवली येथे दरड कोसळून दुर्दैवी दुर्घटना घडली. या घटनेतील अडकलेल्या व्यक्तींच्या शोध व बचावासाठी तात्काळ व्यापक बचावकार्य हाती घेण्यात आले.
या बचाव मोहिमेदरम्यान एका महिलेला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. अन्य दोघांचा शोध सुरू ठेवण्यात आला. मात्र, सलग २१ तासांच्या अथक बचावकार्यानंतर ते दोघेही मृतावस्थेत आढळून आले.
या संपूर्ण बचाव मोहिमेत रत्नागिरी पोलीस, NDRF, स्थानिक ग्रामस्थ तसेच स्थानिक युवकांनी जीवाची पर्वा न करता अथक परिश्रम घेत मोलाचे योगदान दिले.
मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित राहून संपूर्ण बचाव मोहिमेचे नेतृत्व केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व यंत्रणांनी प्रभावी समन्वय साधत युद्धपातळीवर बचावकार्य राबविण्यात आले.
या दुःखद घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत असून, त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात रत्नागिरी पोलीस दल सहभागी आहे. CMOMaharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Sunetra Ajit Pawar Uday Ravindra Samant Yogesh Ramdas Kadam - योगेश रामदास कदम Maharashtra Police Headquarter IGP Konkan Range #landslide #kokan #NDRF #police #ratnagiri
12 views | Ratnagiri, Maharashtra | Jul 7, 2026