स्थानिक विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशी महोत्सवाचे औचीत्य साधत माजी पालकमंत्री तथा बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे विद्यामान आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे हस्ते श्री विठ्ठल-रुक्मीनीचा महाभिषेक करण्यात आला.महोत्सवाच्या निमीत्याने मंदिरात महाभिषेक,आरती,भजन,किर्तन आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमीत्याने मंदिरातून श्री विठ्ठल-रुक्मीनीच्या पालकीची शोभायात्रा काढण्यात येणार आहे.एकादशीचे औचीत्य साधुन शहरातील भाविकांनी श्री विठ्ठल-रुक्मिनीचे दर्शन घेतले.